जालना- लालवाडी ता.अंबड येथील शेतकरी शिवनाथ अश्रूबा पवार (वय ५५) यांनी कर्जाला कंटाळून आज (मंगळवारी) विष प्राशन करून आत्महत्या केली. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
पवार यांच्याकडे ३
एकर शेती होती. त्यांच्यावर बँकेचे ६५ हजार रुपये कर्ज होते. या कर्जाला कंटाळून
त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.